बॉलिवूड ’खिलाडी’ अक्षय कुमारही कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : बॉलिवूडमधील कलाकार एकापाठोपाठ एक असे कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. अभिनेत्री आलिया भट्टने तिला कोरोना झाल्याची बातमी कालच ट्विट केली होती. त्या घटनेला २४ तास उलटत नाही तोच बॉलिवूड ’खिलाडी’ अक्षयकुमार हा कोरोनाबाधित आला आहे. त्याने स्वतःच इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. त्यामुळे त्याचे चाहते चिंतेत सापडले आहेत. अक्षयकुमार ने म्हटले आहे …
 

मुंबई : बॉलिवूडमधील कलाकार एकापाठोपाठ एक असे कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. अभिनेत्री आलिया भट्टने तिला कोरोना झाल्याची बातमी कालच ट्विट केली होती. त्या घटनेला २४ तास उलटत नाही तोच बॉलिवूड ’खिलाडी’ अक्षयकुमार हा कोरोनाबाधित आला आहे. त्याने स्वतःच इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. त्यामुळे त्याचे चाहते चिंतेत सापडले आहेत. अक्षयकुमार ने म्हटले आहे की, नुकतीच माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मी स्वतःला घरीच क्‍वारंटाइन करवून घेतले आहे. मी स्वतःची सर्व काळजी घेत आहे. कोरोनासंबंधीचे नियमांचे पालन करत आहे. जे लोक मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आले होते, त्या सर्वांना विनंती आहे की, त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी.सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी. मी लवकरच परत येईन.
अक्षयकुमार हा बॉलिवूडमधील तब्येतीच्या बाबतीत जागरूक आणि कायम फिट राहणार्‍या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो स्वतःला फिट ठेवून बॉडी बिल्डींग करून मेन्टेन ठेवतो. पडद्यावरील त्याचे स्टंट हटके आणि एकदम कडक असतात. ते पाहण्यासाठीच प्रेक्षक त्याच्या सिनेमांना गर्दी करतात. असे असताना त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने बॉलिवूडची चिंता सतावत आहे. अक्षयकुमार पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर त्याचे अनेक चाहते तसेच बॉलिवूड कलाकरांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. अक्षयकुमार सध्या अतरंगी रे आणि सूर्यवंशी यासिनेमांत काम करत आहे. पैकी सूर्यवंशी प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्याचे तसेच अतरंगी रे या सिनेमाचे चित्रिकरण काही काळ थांबवावे लागण्याची शक्यता आहे.