बाबो… जान्हवीचा ड्रेस पावणेतीन लाखांचा!

सेलेब्रिटींना पैशांचं महत्त्व किती असतं काही माहीत नाही, पण त्यांची एकूण शानशौकत पाहून तरी त्यांना पैशांची किंमत कळत नसावी हेच दिसून येतं. आता जान्हवी कपूरचेच पहा ना, ही श्रीदेवीकन्या चक्क $3,800म्हणजेच २ लाख ७५ हजार २१७ रुपये किंमतचा ड्रेस घालून मिरवत होती. View this post on Instagram A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) जान्हवीने …
 

सेलेब्रिटींना पैशांचं महत्त्व किती असतं काही माहीत नाही, पण त्यांची एकूण शानशौकत पाहून तरी त्यांना पैशांची किंमत कळत नसावी हेच दिसून येतं. आता जान्हवी कपूरचेच पहा ना, ही श्रीदेवीकन्या चक्क $3,800म्हणजेच २ लाख ७५ हजार २१७ रुपये किंमतचा ड्रेस घालून मिरवत होती.

जान्हवीने परिधान केलेला हा स्ट्रॅपलेस सिल्क नियॉन ड्रेस ऑस्ट्रेलियन फॅशन डिझायनर Alexandros Pertsinidis यांनी डिझाइन केला. त्याच्या ब्रॅंडचे नाव ॲलेक्स पेरी असे आहे. एवढा महागडा ड्रेस जान्हवीने ‘रूही’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी परिधान केला होता. या प्रमोशनमधील काही फोटो जान्हवीने सोशल मीडियावरही शेअर केले. इन्स्टाग्रामवर तिच्या या फोटोला ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केले, हे विशेष. ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी जान्हवी शेवटचं ‘कारगिल गर्ल- गुंजन सक्सेना’मध्ये झळकली होती. आता तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट रूही लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात जान्हवीसोबत अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.