फिल्मी दुनिया : …म्‍हणून दलजीत कौर भडकली!

कैसा ये प्यार हैं…, ससुराल सिमर का, सपना बाबुका बिदाई अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेली टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर सध्या चर्चेत आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक बोल्ड फोटो अपलोड केला. या फोटोत तिचे वजन कमी झालेले दिसले. त्यामुळे अनेकांनी तिच्या या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या. ब्रेकअपमुळे दलजीतचे वजन कमी झाले काय, असा प्रश्न काहींनी …
 
फिल्मी दुनिया : …म्‍हणून दलजीत कौर भडकली!

कैसा ये प्यार हैं…, ससुराल सिमर का, सपना बाबुका बिदाई अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेली टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर सध्या चर्चेत आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक बोल्ड फोटो अपलोड केला. या फोटोत तिचे वजन कमी झालेले दिसले. त्यामुळे अनेकांनी तिच्या या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या. ब्रेकअपमुळे दलजीतचे वजन कमी झाले काय, असा प्रश्न काहींनी विचारला. यामुळे दलजीत चांगलीच भडकली आहे. एका वेबसाईटशी बोलताना तिने याबद्दल सांगितले की, लोक काहीही बोलतात. वजन कमी होण्याचा आणि ब्रेकअपचा काय संबंध…? अशा कंमेंट्स करून लोकांना काय सिद्ध करायचे असते काय माहीत, असे ती म्हणाली. दलजीत सध्या एका मुलाची आई आहे. मात्र तिने स्वतःला एकदम फिट आणि तंदुरुस्त ठेवले आहे. तिने तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला आहे. नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर वजन कमी झालं हे जरी खरं असलं तरी मी आई झाले होते आणि गरोदरपणात वाढलेलं वजन मी स्वतः कमी केलं, असं दलजीत म्हणाली. कोरोना महामारीच्या काळात सुद्धा मी फिटनेसकडे पूर्ण लक्ष दिलं. बाळासाठी मला फिट आणि तंदुरुस्त आई व्हायचंय. त्याला आणि स्वतःला आनंदी ठेवायचं, असंही दलजीत म्हणते.