फिल्मी दुनिया : बोल्ड फोटोशूटमुळे दिशा चर्चेत..!
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने अल्पावधीत अभिनय आणि सौंदर्याने स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. काही काळापूर्वी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत तिचे संबंध असल्याची सुद्धा चर्चा होती. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले होते. मात्र त्यांच्या संबंधाबाबत सध्या काय सुरू आहे हे पडद्यामागेच आहे. सध्या दिशा चर्चेत आहे तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे ४२ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यावर ती सतत स्वतःचे फोटो अपलोड करत असते. सध्या तिने तिच्या बेडरूममधील काही फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांचे लाखो लाईक्स आणि कमेंट येत आहेत. जून १९९३ मध्ये जन्मलेल्या दिशाने २०१५ मध्ये लोफर या तेलगू चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये अवतरली होती. या चित्रपटातील तिची छोटीशी भूमिकासुद्धा विशेष गाजली होती.