फिल्म जगत बातमी : अभिनेत्रीला पाठवले नको ते गिफ्ट; तिने पोलिसांत घेतली धाव!
सिंधुदुर्ग : गिफ्ट मिळाल्यावर ते देणाऱ्याविरुद्ध कुणी पोलिसांत तक्रार करेल का? छे… छे… काहीपण का… असं कुणी करतं का कधी? असंच कुणीही म्हणेल. मात्र हे घडलंय… एका अभिनेत्रीने गिफ्ट पाठवणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्रीची भेट व्हावी म्हणून चाहते अनेकदा शक्कल लढवतात. मात्र एकाने लढवलेली शक्कल त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. …
Sep 25, 2021, 11:34 IST
सिंधुदुर्ग : गिफ्ट मिळाल्यावर ते देणाऱ्याविरुद्ध कुणी पोलिसांत तक्रार करेल का? छे… छे… काहीपण का… असं कुणी करतं का कधी? असंच कुणीही म्हणेल. मात्र हे घडलंय… एका अभिनेत्रीने गिफ्ट पाठवणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आपल्या आवडत्या अभिनेत्रीची भेट व्हावी म्हणून चाहते अनेकदा शक्कल लढवतात. मात्र एकाने लढवलेली शक्कल त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. त्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. सिंधुदूर्ग पोलीस ठाण्यातील आंबोली पोलिसांत अभिनेत्रीने तक्रार आहे. एक तरुण तिला लैंगिक उत्तेजना वाढविण्याचे साहित्य व अंतर्वस्त्र गिफ्ट म्हणून वारंवार पाठवत होता. सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्याने अनेकदा ते गिफ्ट अभिनेत्रीला पाठवले. त्यामुळे तिने पोलिसांत धाव घेतली. तरुणाने या भेटवस्तू ऑनलाइन ऑर्डर केल्याचे समोर आले आहे.