पतीची अटक शिल्पा शेट्टीला अशी भोवतेय…
मुंबई ः चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून तरुणींना पोर्न चित्रपटात काम करायला लावणारा शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या अटकेत आहे. मात्र याचा परिमाम शिल्पाच्या कामावरही झाला असून, तिला ‘डान्स दीवाने-४’मधून बाहेर केले जाण्याची शक्यता आहे.
शिल्पा शेट्टी ‘डान्स दीवाने-४’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक आहे. मात्र आता तिच्या पतीला अटक झाली. त्यामुळं शिल्पानं शूटिंग रद्द केलं. मंगळवारी ‘डान्स दीवाने-४’ चं मुंबईत शूटिंग होतं; परंतु पतीला अटक झाल्यामुळं ती शूटिंगला आलीच नाही. मंगळवारी मुंबईत या शोच्या एपिसोडचं शूटिंग पार पडणार होतं. या भागासाठी अभिनेत्री करिश्मा कपूर प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहणार होती; परंतु अगदी शेवटच्या क्षणी शिल्पानं तिचं शूटिंग रद्द केलं. त्यामुळं निर्मात्यांना उर्वरित परीक्षकांच्या उपस्थितीत शूटिंग उरकून घ्यावं लागलं. शोच्या टीमने आता करिश्मा कपूरला पुढील दोन दिवसांसाठी लॉक केलं आहे. शिल्पा जर शूटिंगसाठी पुन्हा आली नाही, तर तिची जागा करिश्मा कपूर घेण्याची शक्यता आहे. सध्या शिल्पाच्या परतण्याची टीमला प्रतीक्षा आहे. शूटिंग करण्यासाठी तिला येता आलं नाही, तर करिश्मा कपूरशी संपर्क साधून तिलाच यी शो मध्ये परीक्षकाची भूमिका देण्याचा विचार आहे. शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा-२’ हा सिनेमा २३ जुलैला प्रदर्शित केला जाणार होता. त्यामुळे ती सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती; मात्र पतीच्या अटकेमुळे सिनेमाच्या प्रमोशनच्या इव्हेंटला ती हजेरी लावू शकणार नाही.