न्यूयॉर्कमध्ये प्रियांकाने उघडले नवे रेस्टॉरंट

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या एका मित्राच्या मदतीने न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंटचा व्यवसाय सुरू केला आहे. या रेस्टॉरंटचे उद्घाटनही तिने नुकतेच केले. सोना असे नाव या रेस्टॉरंटला देण्यात आले आहे. तुमच्या सगळ्यांसमोर सोना, एन.वाय.सी मधील एक नवीन रेस्टॉरंट. यात मी भारतीय जेवणावरचे माझे प्रेम ओतले आहे. सोना हे भारताचे आणि ज्या चवीसोबत मी वाढली त्याचे एक स्वरूप …
 

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या एका मित्राच्या मदतीने न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंटचा व्यवसाय सुरू केला आहे. या रेस्टॉरंटचे उद्‌घाटनही तिने नुकतेच केले. सोना असे नाव या रेस्टॉरंटला देण्यात आले आहे. तुमच्या सगळ्यांसमोर सोना, एन.वाय.सी मधील एक नवीन रेस्टॉरंट. यात मी भारतीय जेवणावरचे माझे प्रेम ओतले आहे. सोना हे भारताचे आणि ज्या चवीसोबत मी वाढली त्याचे एक स्वरूप आहे. उत्तम शेफ हरीनायक याने या रेस्टॉरंटचा मेनू ठरवला आहे, तुम्हाला सगळ्यांना माझ्या देशातल्या सगळ्या प्रकारच्या जेवणाची चव इथे मिळेल, असे यावेळी प्रियांकाने सांगितलं.