नौटंकी… पोलिसांसमोर शिल्पा संतापली पतीवर!
मुंबई : मुलींना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून, त्यांचे अश्लील चित्रीकरण करून, नंतर त्याची विक्री करणाऱ्या राज कुंद्राबाबत आता एक गुपिते बाहेर यायला लागली आहेत. पोलिसांनी तपासासाठी राजला त्याच्या घरी नेले, तेव्हा बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजची पत्नी शिल्पा शेट्टी यांची समोरासमोर चौकशी झाली. चाैकशीच्या शिल्पाच्या संतापाचा उद्रेक झाला. पोलिसांसमोर ती राजवर प्रचंड संतापली होती.
राज कुंद्राला पोलिसांनी अटक केल्यानंतर शिल्पाला मोठा धक्का बसला. ती कोलमडून पडली आहे. तिच्या मनात राजबद्दल प्रचंड संताप, तिरस्कार निर्माण झाला आहे. राजला समोर पाहिल्यानंतर तिचा संताप, तिरस्कार बाहेर पडला. हे सगळे तू का केलंस? तुझ्यामुळं अनेक महत्त्वाची बिझनेस डिल हातातून गेली. कुटुंबाची मोठी बदनामी झाली, असं तिनं संतापानं विचारलं. राज शिल्पाला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तो निरपराध आहे, हे पटवून देण्याचा तो शिल्पाला प्रयत्न करत होता. राजनं आपण पॉर्न फिल्म नाही तर इरॉटिक फिल्म बनवीत होतो, असं पोलिसांना शिल्पासमोर वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. एकीकडं शिल्पा राजवर संतापत होती आणि दुसरीकडं ती राजची बाजू घेत होती. हॉटस्पॉट्स अॅपशी तिचा काहीही संबंध नाही, असं तिनं सांगितलं. पॉर्न आणि इरॉटिक फिल्म वेगवेगळ्या असतात, असा बचाव करताना तिनं अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अश्लील कन्टेटकडं बोट दाखविलं.