नुसरतने अफेअर यशसोबत!
मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल सर्वांसमोर बोलायला आवडत नाही. बर्याच वेळा लोकं माझ्यावर निशाणा साधतात. मात्र यावर मी काही बोलू इच्छित नाही… बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँने सध्या तिच्याविषयी सुरू असलेल्या चर्चेवर हे मत व्यक्त केले. सध्या तिचे अफेअर एसओएस कोलकता चित्रपटामधील तिचा सहकलाकार यश दासगुप्तासोबत सुरू असल्याची चर्चा आहे. 2019 मध्ये उद्योजक निखिल जैनशी नुसरतचे लग्न झाले होते. मात्र आता निखिलशी तिचे पटत नसल्याचे समोर येत आहे. त्यातच आता यशसोबत तिची निर्माण झालेली जवळीक या चर्चेला बळीकटी देत आहे. एखादी चांगली गोष्ट असो किंवा वाईट, खासगी आयुष्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीवर मी बोलू शकत नाही, असे नुसरतने सांगून शंकेला हवा दिली आहे. काही दिवसांपूर्वी नुसरत यशसोबत राजस्थानमध्ये फिरायला गेली होती. त्यामुळे दोघांत काहीतरी शिजत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नुसरत यशला डेट करत असून, तिच्या विवाह संबंधातील तणावालाही तोच जबाबदार असल्याचे समोर येत आहे. त्यातच नुसरतने या विषयावर काहीच बोलण्यास नकार दिल्याने आणखीनच संशय वाढला आहे.