निक्कीचं बॉलीवूड पदार्पण नक्की कधी?

आपल्या बिनधास्त वागण्यामुळे अनेकांची मने जिंकून घेणारी निक्की तांबळी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिला चित्रपटांच्या अनेक ऑफर्स येत आहेत. बिग बॉस १४ मध्ये ती सहभागी होती. या शोमध्ये टास्क खेळण्याची पद्धत आणि भांडणांमुळे ती विशेष चर्चेत राहिली. View this post on Instagram A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने निक्क्कीचे चांगले नाव …
 

आपल्या बिनधास्त वागण्यामुळे अनेकांची मने जिंकून घेणारी निक्की तांबळी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिला चित्रपटांच्‍या अनेक ऑफर्स येत आहेत. बिग बॉस १४ मध्ये ती सहभागी होती. या शोमध्ये टास्क खेळण्याची पद्धत आणि भांडणांमुळे ती विशेष चर्चेत राहिली.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने निक्क्कीचे चांगले नाव आहे. कंचना ३ चित्रपटात निक्की झळकली होती. याशिवाय तिने चिकती गदिलो चितकोतुडु आणि थिप्पारा मीसम या चित्रपटांतही काम केले होते. बिग बॉसमध्ये ती देशभरात प्रसिद्ध झाली. अन्य कलाकारांप्रमाणेच तिलाही बॉलीवूडचे वेध लागले आहेत. सध्या तिला ऑफर्स मिळत आहेत. त्‍यामुळे तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट कोणता असेल, याबाबत तिच्‍या चाहत्‍यांमध्ये उत्‍सुकता पहायला मिळत आहे.