त्याने हात पकडण्याचा प्रयत्न केला, मी कानशिलात लगावली : मीरा

मुंबई ः गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या मी टू मोहिमेमुळे आता अनेक अभिनेत्री आपल्याबाबतचे कटू प्रसंग न घाबरता शेअर करायला लागल्या आहेत. झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोमोची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मीरा जगन्नाथला दोन वेळा कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका लोकप्रिय व्हायला लागली आहे. …
 

मुंबई ः गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या मी टू मोहिमेमुळे आता अनेक अभिनेत्री आपल्याबाबतचे कटू प्रसंग न घाबरता शेअर करायला लागल्या आहेत. झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोमोची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मीरा जगन्नाथला दोन वेळा कास्‍टिंग काऊचचा अनुभव आला आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका लोकप्रिय व्हायला लागली आहे. या मालिकेतील मोमोनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मोमो ही भूमिका करणारी मीरा जगन्नाथ आता घराघरात पोहोचली आहे. योग प्रशिक्षक म्हणून काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत आल्यावर तिला विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागले. काम करण्यासाठी अभिनय चांगला असावा लागतो; परंतु मला मात्र तू नवीन असल्यानं असं करावंच लागतं, असं सांगण्यात आलं. काम मिळवण्यासाठीचे शॉर्टकट मला मान्य नाहीत. कोणत्याही थराला जाऊन एखादी सीरीज किंवा चित्रपट मिळवणं मी कधीच मान्य करीत नाही. एकाच माणसाकडून मला दोनदा असा अनुभव आला, असं मीरा म्हणाली. मीरा म्हणाली, एकदा भूमिका देण्याचं सांगून त्याने हात पकडण्याचा प्रयत्न केला, मी त्याच्या सरळ कानशिलात लगावली. त्यानंतर दोन वर्षे मला काम मिळालं नाही. अशा प्रकारांमुळे कलाकार तणावात जातात. तुम्ही ठरवलं तर दूर राहू शकता. आता ओळखीतून आलेल्या कामालाच मी प्राधान्य देते.