घटस्फोटानंतर मिनिषा पुन्हा पडली प्रेमात…

चित्रपट क्षेत्रातील अभिनेते, अभिनेत्रींची प्रेमप्रकरणं, लफडी, घटस्फोट आदींची नेहमी चर्चा होत असते. कोण कुणाच्या प्रेमात कधी पडेल, कुणी कधी घटस्फोट घेईल आणि दुसऱ्या, तिसऱ्या प्रेमात कधी पडेल, याचा भरवसा देता येत नाही. आमिर खानसह बाॅलिवूडमधील अनेकांच्या घटस्फोटाची प्रकरणं गाजत असताना आता बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा हिच्या घटस्फोटानंतरचं प्रेमप्रकरण चर्चेत आलं आहे. मिनिषा तिच्या लव्ह लाईफमुळं …
 

चित्रपट क्षेत्रातील अभिनेते, अभिनेत्रींची प्रेमप्रकरणं, लफडी, घटस्फोट आदींची नेहमी चर्चा होत असते. कोण कुणाच्या प्रेमात कधी पडेल, कुणी कधी घटस्फोट घेईल आणि दुसऱ्या, तिसऱ्या प्रेमात कधी पडेल, याचा भरवसा देता येत नाही. आमिर खानसह बाॅलिवूडमधील अनेकांच्या घटस्फोटाची प्रकरणं गाजत असताना आता बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा हिच्या घटस्फोटानंतरचं प्रेमप्रकरण चर्चेत आलं आहे.

मिनिषा तिच्या लव्ह लाईफमुळं चर्चेत असते. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय आहे. पती रयान थामशी तिनं घटस्फोट घेतला. बराच काळ ती फिल्मी दुनियेपासून दूर आहे. मिनिषा लांबाच्या दुसऱ्या प्रेमप्रकरणाची चर्चा गेली काही दिवस सातत्यानं होत होती. आता मिनिषानं स्वतःच इन्स्टाग्रामवर आपल्या प्रेम प्रकरणाची कबुली दिली आहे. तिनं तिच्या बाॅयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तिचा बाॅयफ्रेड चित्रपटसृष्टीशी निगडीत नाही. तो एक बिझनेसमन आहे. आकाश मलिका त्याचं नाव. त्यालाच मिनिषा डेट करीत आहे. त्याच्यासोबतच्या कँडल लाईट डिनरचे फोटो मिनिषानं शेअर केले आहेत. मिनिषा आणि आकाश २०१९ मध्ये भेटले होते. आकाशसोबतच्या प्रेमात खूश असल्याचं तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे.