गौहर खान म्हणते, मर्यादा ओलांडणार नाही!

फक्त प्रसिद्धीसाठी मी बोल्ड सीन करणार नाही. हा माझा निर्णय अगदी स्पष्ट आहे. मी जी भूमिका साकारतेय, त्याला पूर्ण न्याय देण्याची एक अभिनेत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. पण हो, माझ्या काही मर्यादा आहेत. फक्त एका शोचा किंवा वेब सीरिजचा भाग होण्यासाठी मी ती मर्यादा ओलांडणार नाही, असं स्पष्टीकरण अभिनेत्री गौहर खानने व्यक्त केलं आहे. काही …
 

फक्त प्रसिद्धीसाठी मी बोल्ड सीन करणार नाही. हा माझा निर्णय अगदी स्पष्ट आहे. मी जी भूमिका साकारतेय, त्याला पूर्ण न्याय देण्याची एक अभिनेत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. पण हो, माझ्या काही मर्यादा आहेत. फक्त एका शोचा किंवा वेब सीरिजचा भाग होण्यासाठी मी ती मर्यादा ओलांडणार नाही, असं स्पष्टीकरण अभिनेत्री गौहर खानने व्यक्त केलं आहे. काही दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेली अभिनेत्री गौहर खान लवकरच तांडव या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या सिरिजसह अन्य अनेक वेब सीरिजमध्ये बोल्ड दृश्य देण्यास तिने नकार दिला आहे. तिने हे नकार का दिले, याचे स्पष्टीकरण दिलं आहे. अर्थात यामागे मुख्य कारण म्हणजे नुकतेच झालेलं लग्न आहे, हे सांगायला नकोच. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं महत्त्व वाढत आहे. गेल्या दीड वर्षांत बोल्ड दृश्य असलेले अनेक प्रोजेक्ट्स नाकारल्याचं गौहरने यावेळी सांगितले. कलाकार म्हणून भूमिकेला पूर्ण न्याय देणं खूप महत्त्वाचं असतं. पण बोल्ड सीन करण्याबाबत मी कम्फर्टेबल नाही. त्यामुळे मी माझा वेगळा पर्याय निवडला आहे, असं ती म्हणाली. आजवर तिने रॉकेट सिंग : सेल्समन ऑफ द इअर, गेम, इशकजादे, बेगम जान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.