गायिकेवर ड्रग्ज देऊन दोनदा बलात्कार… वयाच्या १५ व्या वर्षी झाली होती शिकार!

डेमी लोवाटो… हिला अवघं जग ओळखतं. ती लोकप्रिय गायिका आहे. अवघ्या विश्वात तिची गाणी अगदी आवडीने ऐकली जातात. डेमी लोवाटोच्या आयुष्यावर लवकरच डॉक्युमेंट्री प्रदर्शित होणार असून, यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. डेमी लहान असताना तिच्यावर ड्रग्स देऊन बलात्कार करण्यात आला होता. त्यावेळी ती अवघ्या १५ वर्षांची होती. त्यानंतर आणखी एकवेळेस तिच्यावर बलात्कार झाला होता. …
 

डेमी लोवाटो… हिला अवघं जग ओळखतं. ती लोकप्रिय गायिका आहे. अवघ्या विश्वात तिची गाणी अगदी आवडीने ऐकली जातात. डेमी लोवाटोच्या आयुष्यावर लवकरच डॉक्युमेंट्री प्रदर्शित होणार असून, यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. डेमी लहान असताना तिच्यावर ड्रग्स देऊन बलात्कार करण्यात आला होता. त्यावेळी ती अवघ्या १५ वर्षांची होती. त्यानंतर आणखी एकवेळेस तिच्यावर बलात्कार झाला होता. २०१८ मध्ये ही घटना घडली होती. ‘Demi Lovato: Dancing with the Devil’ असे तिच्यावर येणाऱ्या डॉक्युमेंट्रीचे नाव आहे. दोनदा शारीरिक शोषणाची बळी ठरलेल्या डेमीने धाडसाने या डॉक्युमेंट्रीतून आपल्यावर बेतलेल्या परिस्थितीचे कथन केले आहे. दुसऱ्या वेळेस झालेल्या बलात्काराबद्दल तिने सांगितले, की २०१८ मध्ये बलात्कार करण्याआधी मला हेरोइनचे ओव्हरडोस देण्यात आले होते. अक्षरशः मी मृतावस्थेत होती. बेशुद्ध पडले होते. माझ्या अंगावर कपडे नव्हते. त्याने माझा फायदा उचलला, असे ती म्हणाली. ही डॉक्युमेंट्री २३ मार्चला युट्युबवर पाहायला मिळणार आहे.