करण जोहर होता व्टिंकलच्या प्रेमात!
चित्रपट निर्माता करण जोहर कधीकाळी अभिनेत्री व्टिंकल खन्नाच्या प्रेमात होता, असा खुलासा नुकताच झाला आहे. दोघे लहानपणापासूनचे मित्र. एकत्र शाळेत शिकलेले. दोघांत चांगली मैत्री. यातूनच करण व्टिंकलच्या अगदी जवळ पोहोचला. पण दोघांचा प्रेमाचा प्रवास काही झाला नाही, तो मैत्रीपर्यंतच सिमीत राहिला. याच मैत्रीतून करणने तिला ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात टिना या भूमिकेची ऑफर दिली होती. मात्र तिने दुय्यम भूमिका समजून हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुपरडुपर हिट झाला तेव्हा अर्थातच व्टिंकलला पश्चाताप झाला होता. २९ डिसेंबर १९७४ ला जन्मलेली व्टिंकल प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना व डिंपल कापडिया यांची थोरली मुलगी आहे. तिने १९९५ साली बरसात या चित्रपटातून बॉबी देओलच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. जब प्यार किसी से होता है, बादशाह, मेला आदी हिट चित्रपट देणाऱ्या व्टिंकलने २००१ साली अक्षय कुमारसोबत विवाह केला. त्यानंतर तिने अभिनयसंन्यास घेतला. करण जोहरबद्दल सांगायचे झाल्यास तो भलेही कधीकाळी व्टिंकलच्या प्रेमात असेल पण वास्तवात तो गे असल्याची चर्चा आहे. शाहरुखसोबत त्याचे तसे संबंध असल्याचीही चर्चा मागे पसरली होती. त्यावर शाहरुख आणि करण दोघांनीही नकार देत संताप व्यक्त केला होता. मात्र करणने गे आहे की नाही हे अद्याप स्पष्ट केले नाही विशेष. एका मुलाखतीत त्याने याबद्दल बोललो तर मला जेल होऊ शकते असे विधान केले होते. त्यामुळे त्याच्याबद्दलच्या चर्चांना एकप्रकारे पुष्टीच मिळाली होती.