कतरिनामुळे झरीनच्या करिअरवर परिणाम?

बॉलिवूडमध्ये कुणीही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी येते. मीही आले. स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी गेली 11 वर्षे मी प्रचंड मेहनत घेतली. पण आजपर्यंत लोकं मला मी कतरिनासारखी दिसते असं म्हणतात. मी तिच्यासारखी दिसत असल्यामुळे कोणताही चित्रपट निर्माता माझ्यासोबत काम करण्यास तयार नाही. कतरिनामुळे माझ्या करिअरवर परिणाम झाला, असा आरोप अभिनेत्री झरीन खानने केला आहे.2010 साली …
 

बॉलिवूडमध्ये कुणीही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी येते. मीही आले. स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी गेली 11 वर्षे मी प्रचंड मेहनत घेतली. पण आजपर्यंत लोकं मला मी कतरिनासारखी दिसते असं म्हणतात. मी तिच्यासारखी दिसत असल्यामुळे कोणताही चित्रपट निर्माता माझ्यासोबत काम करण्यास तयार नाही. कतरिनामुळे माझ्या करिअरवर परिणाम झाला, असा आरोप अभिनेत्री झरीन खानने केला आहे.
2010 साली प्रदर्शित झालेल्या वीर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये झरीनने पदार्पण केलं होतं. तिने अनेक हिट चित्रपटांत काम केले पण तिचे ना करिअर सावरले ना तिची वेगळी ओळख निर्माण झाली. झरीन म्हणाली, की मी अभिनेत्री पूजा भट्टसारखी दिसते असेही बर्‍याच वेळा लोकं म्हणतात, कधी तर मी प्रीती झिंटा आणि सनी लिओनीसारखी दिसत असल्याचे म्हणतात. पण लोकं मला मी अभिनेत्री झरीन खान आहे असं का म्हणत नाहीत?, असा सवालही तिने केला. झरीन खानने आजवर हाऊसफूल 2, हेट स्टोरी 3, अकसर 2, रेडी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता लवकरच तिचा हम भी अकेले तुम भी अकेले हा चित्रपट पडद्यावर येणार आहे.