कंगणा भूमिकेप्रती राहते जागरूक…!

कंगना राणावत आपल्या आगामी ‘तेजस’ चित्रपटात भारतीय वायूदलातल्या पायलटची भूमिका साकारणार आहे. सध्या ती चित्रपटासाठी जोरदार मेहनत घेताना दिसत आहे. ट्विटरवर तिने याबाबत एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात ती भूमिकेप्रती किती जागरूक असते हेच दिसून येत आहे. या भूमिकेसाठी ती आर्मी ट्रेनिंग घेत असून, हे ट्रेनिंग मुंबईतील स्टुडिओत सुरू आहे.कंगणाने सांगितले, की केवळ वर्दी …
 

कंगना राणावत आपल्या आगामी ‘तेजस’ चित्रपटात भारतीय वायूदलातल्या पायलटची भूमिका साकारणार आहे. सध्या ती चित्रपटासाठी जोरदार मेहनत घेताना दिसत आहे. ट्विटरवर तिने याबाबत एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात ती भूमिकेप्रती किती जागरूक असते हेच दिसून येत आहे. या भूमिकेसाठी ती आर्मी ट्रेनिंग घेत असून, हे ट्रेनिंग मुंबईतील स्टुडिओत सुरू आहे.
कंगणाने सांगितले, की केवळ वर्दी घालणं एवढंच पुरेसं नसते. या वर्दीसाठी कोणत्या परिस्थितीतून जावे लागते, याची अनुभूतीही मी घेत आहे. वर्दी घालण्याच्या योग्यतेचं शरीर बनायला हवं, असेही ती म्हणाली. या चित्रपटासाठीच्या शूटिंगला सुरुवात झाली अाहे. कंगणा म्हणते, की या चित्रपटाचा लेखक, दिग्ददर्शक सर्वेश मेवारा एक दशकाहून अधिक काळापासून बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत आहे. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी त्याची आई भावूक झाली. ते पाहून मलाही माझ्या कुटुंबियांची आठवण आली, असे कंगणा म्हणाली.