उर्वशीचा वाढतोय भाव…!; तिच्यासाठी आलियाला डच्चू!!

अभिनेत्री उर्वशी रौतेला आता तमिळ चित्रपटसृष्टीतही आपल्या सौंदर्याने जलवा करणार आहे. तब्बल २०० कोटी रुपये बजेट असलेल्या एका चित्रपटात आधी आलिया भट नायिकेची भूमिका साकारणार होती. मात्र ती भूमिका आता उर्वशीच्या वाट्याला आली आहे. जोसेफ डी सामी आणि जेराल्ड आरोकीयम यांचा हा प्रोजेक्ट आहे. अजून चित्रपटाचे नाव ठरलेले नसले तरी कलाकारांची निवड सुरू आहे. उर्वशीला …
 

अभिनेत्री उर्वशी रौतेला आता तमिळ चित्रपटसृष्टीतही आपल्या सौंदर्याने जलवा करणार आहे. तब्बल २०० कोटी रुपये बजेट असलेल्या एका चित्रपटात आधी आलिया भट नायिकेची भूमिका साकारणार होती. मात्र ती भूमिका आता उर्वशीच्या वाट्याला आली आहे. जोसेफ डी सामी आणि जेराल्ड आरोकीयम यांचा हा प्रोजेक्ट आहे. अजून चित्रपटाचे नाव ठरलेले नसले तरी कलाकारांची निवड सुरू आहे. उर्वशीला नायक कोण असेल, हेही अद्याप निश्चित नसले तरी आलियाऐवजी उर्वशीची निवड झाल्याचे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विज्ञानावर आधारित हा चित्रपट असल्याची चर्चा आहे. तो तामिळसह तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. उर्वशीने यापूर्वी काबिल, सनम रे, भाग जॉनीसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले असून, लव डोस, बिजली की तार आणि तेरी लोड वेसारख्या काही म्युझिक अल्बममध्येही ती दिसली होती. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये ती लवकरच झळकणार असल्याची माहिती आहे. या तिच्यासोबत अभिनेता रणदीप हूड्डा दिसेल. ब्लॅक रोज आणि तिरुत्तू पायले २ च्या हिंदी रिमेकमध्येही उर्वशी दिसणार असल्याची माहिती आहे.