उर्वशी रौतेला सौंदर्य, फिटनेस, बोल्‍ड लूकची सम्राज्ञी!; आता शिकतेय “ती’ गोष्ट!

मुंबई ः अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत असते. बोल्ड लूक आणि फॅशन सेन्समुळे तिच्या चाहत्यांमध्ये ती प्रसिद्ध आहे. सौंदर्य, फिटनेस आणि बोल्ड लूकने ती चाहत्यांना घायाळ करते. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. उर्वशी तिच्या आगामी चित्रपटासाठी सध्या कराटे शिकत आहे. तिचा …
 
उर्वशी रौतेला सौंदर्य, फिटनेस, बोल्‍ड लूकची सम्राज्ञी!; आता शिकतेय “ती’ गोष्ट!

मुंबई ः अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत असते. बोल्ड लूक आणि फॅशन सेन्समुळे तिच्या चाहत्यांमध्ये ती प्रसिद्ध आहे. सौंदर्य, फिटनेस आणि बोल्ड लूकने ती चाहत्यांना घायाळ करते. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. उर्वशी तिच्या आगामी चित्रपटासाठी सध्या कराटे शिकत आहे. तिचा आगामी चित्रपट हा एक ॲक्शनपट असल्याची माहिती तिनेच एका मुलाखतीत दिली. हा एक बिगबजेट चित्रपट राहणार असून, यासाठी तिला मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. कराटे शिकण्याचा अनुभव म्हणजे नव्याने शाळेत शिकण्यासारखे आहे, असे उर्वशी मुलाखतीत म्हणाली. एकेकाळी फक्त हॉलिवूडमध्येच अभिनेत्री ॲक्शनपट करायच्या; मात्र आता काळ बदलला असून बॉलिवूडमध्ये सुद्धा ॲक्शनपट येत असल्याचे तिने लाइव्हला सांगितले.