आता श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा…

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलालचं लगीन लागताच आता नेक्स्ट कोण, याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू झाली आहे. साहाजिक सर्वांचे डोळे सध्या प्रेमीयुगुल म्हटलं जाणार्या श्रद्धा कपूर आणि छायाचित्रकार रोहन श्रेष्ठा यांच्याकडे लागले आहेत.श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून रोहनला डेट करत आहे. गेल्या वर्षीच दोघे लग्नही करणार असल्याची चर्चा होती. आता वरुणच्या लग्नानंतर पुन्हा या चर्चेला …
 

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलालचं लगीन लागताच आता नेक्स्ट कोण, याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू झाली आहे. साहाजिक सर्वांचे डोळे सध्या प्रेमीयुगुल म्हटलं जाणार्‍या श्रद्धा कपूर आणि छायाचित्रकार रोहन श्रेष्ठा यांच्याकडे लागले आहेत.
श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून रोहनला डेट करत आहे. गेल्या वर्षीच दोघे लग्नही करणार असल्याची चर्चा होती. आता वरुणच्या लग्नानंतर पुन्हा या चर्चेला उधान आलं आहे. श्रद्धा आणि रोहन कुठेही सोबतच असतात. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाला श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांचाही विरोध नाही. श्रद्धा आणि रोहनच्या अफेअरबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, की मी माझ्या मुलीच्या मागे उभा राहणार. रोहन श्रेष्ठच का? उद्या श्रद्धाने तिच्या पसंतीने कोणाला निवडले व त्याच्यासोबत मला आयुष्य घालवायचे आहे, असे सांगितले तर माझा काहीही आक्षेप नसेल, असे शक्ती कपूर म्हणाले. त्यामुळे श्रद्धा आणि रोहन यांच्या प्रेमात आता कुणाचा अडथळाच राहिलेला नाही. रोहनबद्दल शक्ती कपूर म्हणाले, की तो खूप चांगला मुलगा आहे. लहानपणापासून घरी येतोय. श्रद्धा त्याच्याबरोबर लग्नाचा विचार करतेय, हे तिने मला सांगितलेले नाही. माझ्यासाठी ते दोघेही बालपणीचे मित्र-मैत्रीणच आहेत. परस्पराबद्दल ते गंभीर आहेत का? या बद्दल मला माहित नाही, असे शक्ती कपूर म्हणाले.