आणखी एक स्टार कीड लवकरच बॉलिवूडमध्ये
संजय कपूरची लाडकी लेक शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. शनायाचा एक हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो बेडरूममधला आहे. तिने फेस मास्क लावला असून, ती वेगवेगळे एक्स्प्रेशन देताना दिसत आहे. तिच्यासमोर लॅपटाप आहे. राखाडी शार्ट्स, पँट आणि पांढरे जॅकेट तिने परिधान केले आहे. रविवार हा स्वत: ची काळजी घेण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी आणि स्वत:वर प्रेम करण्यासाठी असतो, असे कॅप्शन शनायाने या फोटोला दिले आहे. थोड्याच वेळात या फोटोला 47 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. शनाया लवकरच एका चित्रपटात झळकणार असून, हा चित्रपट करण जोहरची निर्मिती असल्याचे सांगण्यात येते. चित्रपटाचे नाव आणि कोणकोणते कलाकार त्यात असणार हेही अद्याप निश्चित नाही. शनाया संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी आहे.