अर्शी खानचा होणार स्वयंवर!

मुंबई ः बिग बॉस १४ मध्ये दिसलेली अभिनेत्री अर्शी खान सध्या स्वतःसाठी नवरदेव शोधत आहे. तिला सेटल व्हायचं आहे, पण सलमान खानने तिला यात मदत करावी अशी तिची इच्छा आहे. अर्शी खान लवकरच टीव्हीवर आपला एक शो (अर्शी खान स्वयंवर) घेऊन येत आहे आणि या शोमध्ये ती तिचा वर निवडणार आहे. अर्शी म्हणाली, की मला …
 

मुंबई ः बिग बॉस १४ मध्ये दिसलेली अभिनेत्री अर्शी खान सध्या स्वतःसाठी नवरदेव शोधत आहे. तिला सेटल व्हायचं आहे, पण सलमान खानने तिला यात मदत करावी अशी तिची इच्छा आहे. अर्शी खान लवकरच टीव्हीवर आपला एक शो (अर्शी खान स्वयंवर) घेऊन येत आहे आणि या शोमध्ये ती तिचा वर निवडणार आहे.

अर्शी म्हणाली, की मला वाटते की शोमध्ये वर शोधण्यात सलमानने मदत केली पाहिजे. त्यानेच मला यशस्वी होण्यास मदत केली. बिग बॉसच्या घरात त्याने मला आजीवन धडा शिकविला. स्वयंवरनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर ती काम करणार आहे. तिने सांगितले की तिला बऱ्याच ऑफर्स येत आहेत; पण स्वयंवरमध्ये व्यस्त राहिल्यामुळे ती त्या ऑफर्स स्वीकारू शकली नाही. पण शो संपताच पुन्हा एकदा अभिनयाच्या जगात परत येईल. अभिनय आणि मॉडेलिंगच्या जगात प्रवेश करण्यापूर्वी अर्शी खान फिजिओथेरपिस्ट होती. तिने तमिळ चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय ती “सावित्री देवी कॉलेज आणि हॉस्पिटल’ आणि “विश’ सारख्या टीव्ही शोमध्येही दिसली होती.