अमृता खानविलकरने सांगितले आकर्षकतेचे रहस्य!
अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या शरीरयष्टीकडे विशेष लक्ष देऊन असते. ती फिट राहण्यावर भर देते. यासाठी वर्कआउटसोबत योगाही करते. योगा केल्याने केवळ फिटनेसच नाही तर मानसिक स्वास्थही चांगलं राहतं, असे अमृताने म्हटले आहे. हेच आपल्या सौंदर्य आणि आकर्षकतेचे रहस्य असल्याचेही तिने म्हटले आहे. View this post on Instagram A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) अमृताने …
Mar 15, 2021, 09:29 IST
अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या शरीरयष्टीकडे विशेष लक्ष देऊन असते. ती फिट राहण्यावर भर देते. यासाठी वर्कआउटसोबत योगाही करते. योगा केल्याने केवळ फिटनेसच नाही तर मानसिक स्वास्थही चांगलं राहतं, असे अमृताने म्हटले आहे. हेच आपल्या सौंदर्य आणि आकर्षकतेचे रहस्य असल्याचेही तिने म्हटले आहे.
अमृताने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला असून, या व्हिडीओत ती योगासनं करताना दिसत आहे. योग्य सकाळ, मी पुन्हा इथं कायम परत येऊ शकते, असे तिने व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओला अनेकांनी लाइक केलं आहे. तिचा पती हिमांशू मल्होत्रानेदेखील तिचं कौतुक केलं अाहे. राजी, मलंग या हिंदी सिनेमांसोबतच डॅमेज्ड या हिंदी वेब सीरिजमध्ये अमृता झळकली असून, आगामी काळात पॉन्डेचेरी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.