अभिनेत्री रिचा चड्डा म्हणते, मी मुख्यमंत्री होईल की नाही…

मुंबई ः अभिनेत्री रिचा चड्डा पडद्यावर निर्भीड भूमिकांसाठी प्रसिद्ध असते. तिच्या व्यक्तिगत आयुष्यातही ती अनेक मुद्यांवर तेवढ्याच निर्भीडपणे व्यक्त होत असते. नुकतीच तिची कँडी ही वेबसिरीज प्रसारित झाली. यात तिने एका कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. “मॅडम चीफ मिनिस्टर’मध्ये तिने मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यात मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर काय करशील, …
 
अभिनेत्री रिचा चड्डा म्हणते, मी मुख्यमंत्री होईल की नाही…

मुंबई ः अभिनेत्री रिचा चड्डा पडद्यावर निर्भीड भूमिकांसाठी प्रसिद्ध असते. तिच्या व्यक्तिगत आयुष्यातही ती अनेक मुद्यांवर तेवढ्याच निर्भीडपणे व्यक्त होत असते. नुकतीच तिची कँडी ही वेबसिरीज प्रसारित झाली. यात तिने एका कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. “मॅडम चीफ मिनिस्टर’मध्ये तिने मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यात मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर काय करशील, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली, की खऱ्या आयुष्यात मुख्यमंत्री होता येईल की नाही ते माहीत नाही. मात्र सिनेसृष्टीची प्रतिनिधी झालेच तर खूप बदल घडवेल. कामाचे बारा तास असतील. लाईटमॅन, स्टंटमॅन यांच्या परिवाराला मदत करेल. ज्‍येष्ठ कलाकारांना आर्थिक मदत, मेडिकल, आरोग्य विमा आणि रॉयल्टी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असे रिया म्हणाली.