अभिनेत्री निकिता रावलने सांगितला तिच्या आयुष्यातील भयानक अनुभव; तिला वाटतं होत “ते’ तिच्यावर रेप करतील!
मुंबई : अभिनेत्री निकिता रावलने तिला दिल्लीत आलेला एक अनुभव सांगितला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, दिल्लीतील शास्त्रीनगर भागात गुंडांनी अडवून तिच्याकडील ७ लाख रुपयांच्या वस्तू लुटल्या. लूट होताना त्यांची एकूणच वर्तणूक भयानक होती. मला ते माझ्यावर बलात्कार करतील, अशी भीती वाटत होती, असे निकिताने म्हटले आहे.
निकिताने सांगितले की, रात्री १० वाजता दिल्लीत ती तिच्या काकूंकडे जात होती. इनोव्हा कार गुंडांनी तिच्यासमोर आडवी लावली. ४ मास्क घातलेल्या लोकांनी बंदुकीचा धाक दाखवून तिच्याकडील सर्वच वस्तू लुटल्या. अंगठी, घड्याळ, हिऱ्यांचे पेडेंट, कानातले आणि काही रोख रक्कम लुटल्याचे तिने सांगितले. मला त्या घटनेबद्दल सांगताना अजूनही भीती वाटत असल्याचे ती म्हणाली. ते लोक मला मारतील, याहीपेक्षा ते माझा रेप करतील, अशी भीती मला वाटत होती, असे निकिता म्हणाली. घटनेनंतर ती घरी पोहोचली. तिने स्वतःला लॉक करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच ती मुंबईला परतली, असे निकिताने सांगितले. निकिताने व्यक्त केलेल्या भयानक अनुभवामुळे दिल्लीत महिला, मुली किती असुरक्षित आहेत, यावर चर्चा घडत आहे.