अनन्याची लोक खिल्ली उडवत होते, कारण…
आजघडीला अभिनेत्री अनन्या पांडेचे लोक कौतुक करताना थकत नसले तरी कधीकाळी मात्र तिच्या शरीरावरून तिला चिडवले जात होते. ती अत्यंत काटकुळी होती. तिच्या बारीक दिसण्यावरून अनेक जण टीका करायचे. तू मुलांसारखी दिसतेय, फ्लॅट दिसतेस असे तिला चिडवले जायचे. स्वतः अनन्याने याबाबत माहिती दिली.
अनन्या सांगते, की मला तारीख नीट आठवत नाही. पण आई-बाबांसोबतचे एक छायाचित्र मी शेअर केले होते. त्यावेळी अभिनेत्रीही नव्हते. खूप बारीक होती. तो फोटो पाहून लोकांनी माझ्यावर वाईट कमेंट केल्या. त्या कमेंट वाचून मला दुःख व्हायचं. कारण मी त्यावेळी मोठी होत होती. स्वतःवर प्रेम करायला शिकण्याची ती वेळ होती. त्याच वेळी लोकांनी माझा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा तुम्ही मोठे होत असता आणि अशा वेळी तुमच्यावर केल्या जाणाऱ्या अशा कमेंट तुम्हाला मागे खेचत राहतात. तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो. खरतर मी आता अशा ठिकाणी पोहोचली आहे, जिथे मी सगळ्या गोष्टींना स्वीकारले आहे, असे अनन्या म्हणाली. ‘पत्नी पत्नी और वो’मध्ये अनन्या भूमी पेडणेकर आणि कार्तिक आर्यनसोबत दिसली होती. त्यानंतर सध्या ती दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ या चित्रपटात दिसणार असून, हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले. हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये हा प्रदर्शित होणार असल्याचे समजते.