अक्कीचं पुन्हा वाढलं मानधन!; प्रत्येक चित्रपटाचे 135 कोटी रुपये घेणार

वर्षभरात अक्षय कुमारचे 4 ते 5 चित्रपट सहज प्रदर्शित होतात. त्याचे मानधन आजवर किमान शंभर कोटींच्या घरात होते. अशा पद्धतीने 4 ते 5 चित्रपटांचे मानधन किती होत असेल याचा विचार करा. चक्रावून जाल इतकी त्याची वार्षिक कमाई आहे आणि तुम्ही बेशुद्ध पडायची वेळ आली. कारण त्याने आपलं मानधन आणखी वाढवलं आहे. आता तो प्रत्येक चित्रपटासाठी …
 

वर्षभरात अक्षय कुमारचे 4 ते 5 चित्रपट सहज प्रदर्शित होतात. त्याचे मानधन आजवर किमान शंभर कोटींच्या घरात होते. अशा पद्धतीने 4 ते 5 चित्रपटांचे मानधन किती होत असेल याचा विचार करा. चक्रावून जाल इतकी त्याची वार्षिक कमाई आहे आणि तुम्ही बेशुद्ध पडायची वेळ आली. कारण त्याने आपलं मानधन आणखी वाढवलं आहे. आता तो प्रत्येक चित्रपटासाठी 135 कोटी रुपये घेणार आहे. एकीकडे कोरोनाने सारेच हवालदिल झाले असताना दुसरीकडे अक्षयची कमाई जोरदार सुरू आहे. अक्षयने त्याच्या मानधनाची रक्कम 99 कोटी रुपयांवरून 108 कोटी रुपये केली होती. आता अक्षयने 2022 मध्ये प्रदर्शित होणार्‍या प्रत्येक चित्रपटाच्या मानधनाची रक्कम वाढवत 135 कोटी रुपये इतकी केली आहे. अक्षय त्याचा खास मित्र व निर्माता फिरोज नाडियादवाला याला मानधनात विशेष सूट देत असल्याची चर्चा आहे. फक्त फिरोजसोबत काम करताना अक्षय त्याचं मानधन कमी करतो, असं सांगितलं जातं. अक्षय कुमारचा लक्ष्मी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्याचा सूर्यवंशी हा बहुप्रतिक्षित चित्रपट मार्च 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षयने बेल बॉटमचे शूटिंग पूर्ण केले असून, अतरंगी रे, पृथ्वीराज, राम सेतु, मिशन लायन, रक्षाबंधन असे अक्षयचे अनेक चित्रपट येत्या दोन वर्षात प्रदर्शित होणार आहेत.