Bollywood : सलमान जरा स्वतःच्या वयाच्या मुलींसोबत काम कर… या अभिनेत्रीने दिला सल्ला!
मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः मॉडेल सोफिया हयातने सलमान खानवर शरसंधान साधले आहे. राधे चित्रपटावरून त्याच्यावर टीका केली असून, आपल्या वयाच्या अभिनेत्रींसोबत कधी काम करणार, असा प्रश्न तिने सलमानला केला आहे. तिच बोरिंग कथा आणि लूक असे तिने राधे चित्रपटाबद्दल म्हटले आहे. राधे पाहून नवीन काहीच पाहायला मिळाले नाही, असे ती म्हणाली. तरुण अभिनेत्रींसोबत नेहमी …
Jun 9, 2021, 13:18 IST
मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः मॉडेल सोफिया हयातने सलमान खानवर शरसंधान साधले आहे. राधे चित्रपटावरून त्याच्यावर टीका केली असून, आपल्या वयाच्या अभिनेत्रींसोबत कधी काम करणार, असा प्रश्न तिने सलमानला केला आहे. तिच बोरिंग कथा आणि लूक असे तिने राधे चित्रपटाबद्दल म्हटले आहे. राधे पाहून नवीन काहीच पाहायला मिळाले नाही, असे ती म्हणाली.
तरुण अभिनेत्रींसोबत नेहमी सलमान काम करतो. कधीतरी आपल्या वयाच्या अभिनेत्रीसोबत काम कर, असा खोचक सल्लाही तिने त्याला दिला आहे. रणदीप हुड्डाबद्दल तिने सहानुभूती दाखवली असून, तो उत्तम कलाकार आहे. मात्र त्याचा रोल विशेष नव्हता. राधेतील रणदीपचे पात्र योग्य पद्धतीने लिहिले गेले नव्हते. याविरोधात तो बोलला तर त्याला बॉलिवूडमधून बाहेर काढतील, असा आरोपही सोफियाने केला आहे.