Live सोबत कोंकणा Live! अनेक विषयावर झाली व्‍यक्‍त.. म्‍हणाली, माझ्याकडे भूमिका जीवंत करण्याचे कसब!, बॉलीवूडसारखी डिजिटल प्‍लॅटफॉर्मवर एकाधिकारशाही नाही; ९ सप्‍टेंबरला येणार नव्या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटायला!!

मनोज सांगळे मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यावर आजवर अनेक चित्रपट, मालिका अगदी वेबसिरिजही बनल्या आहेत. आता आणखी एका चित्रपटाची भर त्यात पडत असून, मुंबई डायरीज २६/११ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात पेज ३, ओमकारा, वेकअप सिड सारख्या चित्रपटांत अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा दिसणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर …
 
Live सोबत कोंकणा Live! अनेक विषयावर झाली व्‍यक्‍त.. म्‍हणाली, माझ्याकडे भूमिका जीवंत करण्याचे कसब!, बॉलीवूडसारखी डिजिटल प्‍लॅटफॉर्मवर एकाधिकारशाही नाही; ९ सप्‍टेंबरला येणार नव्या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटायला!!

मनोज सांगळे

मुंबईवरील २६/११ च्‍या हल्ल्यावर आजवर अनेक चित्रपट, मालिका अगदी वेबसिरिजही बनल्या आहेत. आता आणखी एका चित्रपटाची भर त्‍यात पडत असून, मुंबई डायरीज २६/११ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात पेज ३, ओमकारा, वेकअप सिड सारख्या चित्रपटांत अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा दिसणार आहे. हा चित्रपट ९ सप्‍टेंबरला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. यानिमित्ताने कोंकणा सेन शर्माने Buldana Live.com ला ऑनलाइन मुलाखत दिली. या मुलाखतीत ती अनेक विषयांवर मोकळेपणाने व्यक्‍त झाली…

या चित्रपटाबद्दल कोंकणाने सांगितले, की हा चित्रपट म्‍हणजे डॉक्‍युमेंट्री नाही. त्‍यामुळे आम्‍ही मुंबई हल्ल्याची घटना जशीच्‍या तशी दाखवलेली नाही. आम्‍ही यात काही काल्पनिक गोष्टींचाही समावेश केलेला आहे. हॉस्पिटल नर्स, वॉर्ड बॉय, मीडियासारख्या फ्रंटलाइन वर्कर्स व सामान्य लोकांचे आयुष्य या चित्रपटाच्‍या केंद्रस्‍थानी आहे. या चित्रपटात मी चित्रा दास हे काल्‍पनिक पात्र रंगवले आहे.

Live सोबत कोंकणा Live! अनेक विषयावर झाली व्‍यक्‍त.. म्‍हणाली, माझ्याकडे भूमिका जीवंत करण्याचे कसब!, बॉलीवूडसारखी डिजिटल प्‍लॅटफॉर्मवर एकाधिकारशाही नाही; ९ सप्‍टेंबरला येणार नव्या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटायला!!

भूमिका कोणतीही असो, त्‍यात शिरून जीवंत करते…
कोंकणा सेन शर्मा सांगते, की भूमिका कोणतीही असो. ती मी भूमिका जीवंत करण्याचे कसब माझ्यात आहे. त्‍या भूमिकेत शिरणे मला आवडते. कधी कधी माझ्या आयुष्याशी, वागण्या-बोलण्याशी अगदी वेगळी भूमिका माझ्या वाट्याला येते. पण तीही साकारण्याची मेहनत घेण्याची माझी तयारी असते, असे ती म्‍हणाली. याचे उदाहरण सांगताना कोंकणा म्‍हणाली, की ओमकारा चित्रपटातील इंदू त्‍यागीची भूमिका ग्रामीण भागातील महिलेची होती. तिचे वागणेबोलणे वेगळे होते. अशा भूमिकांसाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते. मात्र काही भूमिका अगदी माझ्या लाइफस्‍टाइलशी निगडित असतात, जशी की पेज ३ ची माधवी शर्मा… खऱ्या आयुष्यातील या लोकांना मी आत्‍मसात करण्याचा प्रयत्‍न करते, असेही कोंकणा म्‍हणाली.

डिजिटल प्‍लॅटफॉर्मवर सक्रीय
गेल्या काही दिवसांपासून कोंकणा डिजिटल प्लॅटफॉवर सातत्याने दिसत आहे. सुरुवातीला तिने नेटफ्‍लिक्सवर प्रसिद्ध झालेल्या अजीब दास्‍ता चित्रपटात काम केले होते. चित्रपटांची निवड कशी करते, असे विचारले असता कोंकणा सांगते, की माझ्यासाठी चित्रपटाची स्‍क्रिप्ट महत्त्वाची असते. भूमिका आवडली तरच मी होकार देते. डिजिटल प्लॅटफॉर्मवर ज्या पद्धतीचे चित्रपट, मालिका, दृश्ये प्रेक्षकांना हवे असतात, ते देण्याचा प्रयत्‍न करून सिनेमांतही बदल घडत असल्याचे तिने सांगितले. अर्थातच तिचा हा रोख अश्लीलतेकडे होता. आता हिरो, हिरोईन, गाणे असलेले चित्रपट गरजेचे नाहीत. असे अनेक कलाकार आहेत ज्‍यांना चित्रपटांत लोकप्रियता मिळाली नाही मात्र डिजिटल प्‍लॅट फॉर्मवर ते लोकप्रिय झाले आहेत. हा प्लॅटफॉर्म त्‍यांना संधी देत आहे, असेही तिने सांगितले. सिनेमासारखे या क्षेत्रावर एकाधिकारशाही नाही, असे ती म्‍हणाली.

अभिनय हीच पहिली पसंत…
कोंकणाने २०१७ मध्ये अ डेथ इन द गंज या चित्रपटाचे दिग्‍ददर्शन केले होते. मात्र तिला अभिनय करणेच आवडतो. ती सांगते, की मी आधी अभिनेत्री आहे. मी अभिनयातच व्‍यस्‍त राहते. मला १० वर्षांचा मुलगा आहे. त्‍याचा सांभाळ ही माझ्यासाठी प्राधान्याची गोष्ट आहे. दिग्‍ददर्शनासाठी खूप वेळ पाहिजेत. त्‍यामुळे मी त्‍यासाठी घाई करत नाही. मात्र तरीही चांगली कथा मिळत असेल तर दिग्‍ददर्शनाबद्दलही विचार करेल, असेही कोंकणा म्‍हणाली.