Chanderi News : सुष्मिता सेन तोंडावर पडता पडता वाचली…
अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या चित्रपटसृष्टीपासून थोडीशी दूर असली तरी तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुकानातून बाहेर येता येता तिचा हाय हिल्स घातलेला पाय मॅटमध्ये अडकतो आणि ती पडता पडता स्वतःला सावरते. अरे बापरे मी पडले असते, असं ती म्हणते. यात तिने अंगावर पांढरा ड्रेस परिधान केलेला दिसतोय. व्हायरल होत असलेल्या या …
Oct 15, 2021, 14:05 IST
अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या चित्रपटसृष्टीपासून थोडीशी दूर असली तरी तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुकानातून बाहेर येता येता तिचा हाय हिल्स घातलेला पाय मॅटमध्ये अडकतो आणि ती पडता पडता स्वतःला सावरते. अरे बापरे मी पडले असते, असं ती म्हणते. यात तिने अंगावर पांढरा ड्रेस परिधान केलेला दिसतोय. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर युझर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अरे बापरे पडली असती ना तोंडावर, असे एका युझर्सने विनोदाने लिहिले आहे. सुष्मिता सेन तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. बोल्ड आणि बिनधास्त असणारी सुष्मिता मीडिपासून कधी काही लपवत नाही. तिच्या नात्यांचा ती जगासमोर उघडपणे स्वीकार करते. सध्या ती तिच्यापेक्षा तब्बल १५ वर्षांनी लहान असलेल्या रोहमन शॉलला डेट करत आहे. दोघे अनेकदा सोबत एकत्र वेळ घालविताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.