Chanderi News : घरच्यांनी होकार दिला नसता तर करिना जाणार होती पळून…
मुंबई ः वयाने १० वर्षे मोठ्या सैफ अली खानच्या प्रेमात करिना कपूर आकंठ बुडाली होती. त्यावेळी सैफशी लग्न करण्यास घरच्यांनी विरोध सुरू केला होता. मात्र करिना निर्णयावर ठाम होती. घरच्यांनी होकार दिलाच नसता तर पळून जाऊन लग्न करण्याची तयारी तिने केली होती. खुद्द करिनानेच हा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.
रिना अन् सैफच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. १६ ऑक्टोबर २०१२ ला त्यांचं लग्न झालं होतं. करिना सांगते, की आमच्याबद्दल सर्वांनाचा उत्सुकता होता. प्रेम प्रकरणाची माहिती मीडियातून सर्वांसमोर जात होती. त्यामुळे लग्नाचे इव्हेंटही मीडिया कव्हर करणार हे उघड होतं. पण आम्हाला ते नको होतं. आम्ही थेट कोर्ट मॅरेज केलं आणि छतावर जाऊन सर्वांना हॅलो बोललो, असे ती म्हणाली. सैफची निवड करण्याचे कारण सांगताना ती म्हणाली, की मला आत्मनिर्भर स्त्री म्हणून जगायचेय.
लग्नानंतरही काम करायचे होते. सैफने माझी अट मान्य केली. त्यामुळे सैफशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी आम्ही ५ वर्षे प्रेमसंबंधात काढले, असे करिना म्हणाली. विशेष म्हणजे, करिनाचे सैफ हे पहिलेच प्रेम होते असे नाही. सैफ आधी ती शाहिद कपूरसोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होती. मात्र काही कारणांमुळे दोघांत बिनसले आणि तिने सैफशी नाते जोडले. टशन चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना दोघांतील नाते निर्माण झाले आणि फुलल्याचे सांगण्यात येते.