Chanderi News : इथं कोण धुतल्या तांदळासारखं?; “ही’ अभिनेत्री म्हणते, मी स्वतः दिव्या भारतीसोबत ड्रग्स घेतले!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केल्यानंतर खळबळ उडाली आहे. अनेक अभिनेत्यांनी शाहरुखला पाठिंबा दर्शवत आम्ही तुझ्यासोबत आहोत, असे म्हटले आहे तर काहींनी बॉलिवूडमध्ये हा प्रकार नवीन नाही, असे म्हटले आहे. सलमान खानची एकेकाळची गर्लफ्रेंड सोमी अलीनेदेखील शाहरुख व आर्यनला पाठिंबा दर्शविला आहे. सोमी अलीने सोशल मीडियावर एक …
 
Chanderi News : इथं कोण धुतल्या तांदळासारखं?; “ही’ अभिनेत्री म्हणते, मी स्वतः दिव्या भारतीसोबत ड्रग्स घेतले!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केल्यानंतर खळबळ उडाली आहे. अनेक अभिनेत्यांनी शाहरुखला पाठिंबा दर्शवत आम्ही तुझ्यासोबत आहोत, असे म्हटले आहे तर काहींनी बॉलिवूडमध्ये हा प्रकार नवीन नाही, असे म्हटले आहे. सलमान खानची एकेकाळची गर्लफ्रेंड सोमी अलीनेदेखील शाहरुख व आर्यनला पाठिंबा दर्शविला आहे.

सोमी अलीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून शाहरुख खान व आर्यन खानला पाठिंबा दिला आहे. या पोस्टमध्ये तिने एक खुलासा सुद्धा केला आहे. तिने म्‍हटले आहे, की “मी १५ वर्षांची होते तेव्हा ड्रग्स घेतले होते. आंदोलन चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी मी आणि दिव्या भारतीने एकत्र ड्रग्स घेतले होते’, असे सोमी अलीने पोस्ट मध्ये लिहिले आहे. बॉलिवूडमध्ये कुणीही संत व धुतल्या तांदळासारखे नाही. मुलांना दोष देण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे सर्व मुलांना सोडून द्यायला हवे. आपण कसे योग्य आहोत हे पटवून देण्याचा न्यायव्यवस्था प्रयत्न करते. मात्र यामुळे मुलांना त्रास होतो, असेही सोमी अलीने पोस्टमध्ये म्हटले आहे.