

Chanderi news टूथब्रश विक्रेता बनला बॉलीवूडचा सर्वात श्रीमंत व्यक्ती! भल्याभल्यांना पाजलं पाणी; शाहरुख-सलमान– आमिर खानची संपत्ती एकत्र करूनही नाही होत बरोबरी...
Apr 4, 2025, 12:16 IST
बॉलीवूड स्टार्सची संपत्ती हजारो कोटींमध्ये आहे.. शाहरुखखान बॉलीवूड मधील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. शाहरुख खान पेक्षा सलमान खान आणि आमिर खानची संपत्ती कमी आहे.. फोर्ब्स ने २०२५ ची जगातील सर्वात श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ३०२८ लोकांना स्थान मिळालं आहे. विशेष म्हणजे या यादीत भारतातील २०५ लोकांना स्थान देण्यात आले आहे..

भारतातील उद्योग, मनोरंजन, माध्यमांसह विविध क्षेत्रातील २०५ लोकांचा सर्वात श्रीमंतांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीनुसार बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती एखादा अभिनेता नाही तर एकेकाळी टूथब्रश विकणारा व आता चित्रपट निर्माता बनलेला व्यक्ती आहे.
शाहरुख, सलमान,अमीर पेक्षाही श्रीमंत...
चित्रपट निर्माते आणि उद्योजक असलेले रॉनी स्क्रूवाला हे बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. रॉनी यांची एकत्रित संपत्ती ही १२ हजार ६२ कोटी रुपये एवढी आहे. रॉनी स्क्रूवाला यांनी संपत्तीच्या बाबतीत शाहरुख खानला ही मागे टाकले आहे. यादीनुसार शाहरुख खानची आज घडीची एकत्रित संपत्ती ६ हजार ५६६ कोटी एवढी आहे.. सलमान खानची संपत्ती ३ हजार ३२५ कोटी तर आमिर खानची संपत्ती १ हजार ८७६ कोटी एवढी आहे. तिन्ही खानांची एकत्रित संपत्ती पेक्षाही रॉनी स्क्रूवाला यांची संपत्ती जास्त आहे.
उद्योजक असलेल्या रॉनी स्क्रूवाला यांनी टूथब्रश बनवणाऱ्या कंपनीपासून आपल्या व्यावसायिकतेचा प्रवास सुरू केला. रॉनी स्क्रूवाला यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या निर्मिती खाली "रंग दे बसंती" " "स्वदेश" "जोधा अकबर" "फॅशन" यासह अनेक सुपरहिट चित्रपट बनवले गेले आहेत..