Chanderi News : विकी कौशल “या’ अभिनेत्रीशी बांधणार लगीनगाठ!; कतरिना धोका दिला?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दोघेही एकमेकांना जिवापाड जपतात, एकमेकांवर भरभरून प्रेम करतात अशा बातम्या येत होत्या. मात्र आता विकी कौशल एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. अर्थात यामुळे त्याने कतरिनाला धोका असा तुमचा समज झाला असेल तर तोही चुकीचा आहे. कारण वास्तवात …
 
Chanderi News : विकी कौशल “या’ अभिनेत्रीशी बांधणार लगीनगाठ!; कतरिना धोका दिला?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दोघेही एकमेकांना जिवापाड जपतात, एकमेकांवर भरभरून प्रेम करतात अशा बातम्या येत होत्या. मात्र आता विकी कौशल एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. अर्थात यामुळे त्याने कतरिनाला धोका असा तुमचा समज झाला असेल तर तोही चुकीचा आहे. कारण वास्‍तवात नाही तर नव्या चित्रपटात विकी कौशल आणि सारा अली खान पती- पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

पहिल्यांदाच विकी आणि सारा एकत्र काम करणार आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे नाव मात्र अद्यापपर्यंत निश्चित झालेले नाही. एका छोट्या शहरात राहणाऱ्या जोडप्यावर हा चित्रपट राहणार आहे. गरिबीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या एका जोडप्याची भूमिका विकी आणि सारा साकारणार आहेत. या चित्रपटातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करणार आहेत.