CHANDERI NEWS : नुसरत जहाँने दिली प्रेमाची कबुली!

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून त्या घटस्फोट आणि गरोदरपणामुळे चर्चेत आहेत. नुसरत जहाँ अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या. आता या चर्चेला खुद्द नुशरतने पूर्णविराम दिला आहे. तिने स्वतः प्रेमाची कबुली दिली आहे. नुसरत आणि यशने लग्न केल्याची चर्चा …
 
CHANDERI NEWS : नुसरत जहाँने दिली प्रेमाची कबुली!

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून त्या घटस्फोट आणि गरोदरपणामुळे चर्चेत आहेत. नुसरत जहाँ अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या. आता या चर्चेला खुद्द नुशरतने पूर्णविराम दिला आहे. तिने स्वतः प्रेमाची कबुली दिली आहे. नुसरत आणि यशने लग्न केल्याची चर्चा सुरू होती. नुकताच यशचा वाढदिवस झाला. हा वाढदिवस दोघांनी एकत्र घरातच साजरा केला. नुसरतने इन्‍स्टाग्रामवर केकचा फोटो शेअर केला आहे. त्यावर हॅपी बर्थडे माय लव्ह असे लिहिलेले असल्याने तिने प्रेमाची कबुली दिल्याचे बोलले जात आहे.