Chanderi News : आर्यन खानला जामीन मिळाला नाही म्‍हणून शाहरुखने डायरेक्ट वकीलच बदलला!

मुंबई : जहाजावर ड्रग्स पार्टी करताना पकडण्यात आल्याने शाहरुखचा मुलगा आर्यन खान चांगलाच अडचणीत आला आहे. अटकेनंतर १२ दिवस उलटूनही त्याला जामीन मिळवून देण्यात त्याचे वकील सतिश माने कमी पडले. दोन्ही वेळा जामीन फेटाळल्याने शाहरुखने आता वकीलच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे आर्यनची केस प्रसिद्ध वकील अमित देसाई लढणार आहेत. अमित देसाई क्राईमची प्रकरणे …
 
Chanderi News : आर्यन खानला जामीन मिळाला नाही म्‍हणून शाहरुखने डायरेक्ट वकीलच बदलला!

मुंबई : जहाजावर ड्रग्स पार्टी करताना पकडण्यात आल्याने शाहरुखचा मुलगा आर्यन खान चांगलाच अडचणीत आला आहे. अटकेनंतर १२ दिवस उलटूनही त्याला जामीन मिळवून देण्यात त्याचे वकील सतिश माने कमी पडले. दोन्ही वेळा जामीन फेटाळल्याने शाहरुखने आता वकीलच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे आर्यनची केस प्रसिद्ध वकील अमित देसाई लढणार आहेत.

अमित देसाई क्राईमची प्रकरणे हाताळणारे वकील आहेत. अमित देसाई यांनीच सलमान खानला हिट अँड रन प्रकरणात जामीन मिळवून दिला होता. सतिश माने यांनी आर्यनजवळ कोणतेही ड्रग्स सापडले नसल्याचे कोर्टात म्हटले होते. त्यामुळे आर्यनला कोठडीत ठेवल्याने त्याचे व्यक्तिस्वातंत्र धोक्यात येत असल्याचा युक्तिवाद कोर्टात केला होता. मात्र या युक्तिवादाचा कोर्टावर परिणाम झाला नाही. परिणामी मुलाला जामीन मिळत नसल्याचे शाहरुखने वकील बदलला आहे. अमित देसाई अतिशय महागडे वकील असून एका दिवसाच्या सुनावणीसाठी ते तब्बल १० लाख रुपये घेतात.