CHANDERI NEWS : आर्यन खानच्या अडचणी वाढता वाढता वाढे..!

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या अडचणींत सातत्याने वाढ होत आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यास एनसीबीने विरोध दर्शविल्याने आणखी आठवडाभर तुरूंगात राहण्याची वेळ आर्यनवर येऊ शकते. आर्यन खानकडून कोणतेही अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले नाही. त्यामुळे त्याला कोठडीत ठेवणे …
 
CHANDERI NEWS : आर्यन खानच्या अडचणी वाढता वाढता वाढे..!

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्‍याच्या अडचणींत सातत्याने वाढ होत आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यास एनसीबीने विरोध दर्शविल्याने आणखी आठवडाभर तुरूंगात राहण्याची वेळ आर्यनवर येऊ शकते.

आर्यन खानकडून कोणतेही अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले नाही. त्यामुळे त्याला कोठडीत ठेवणे म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आहे. त्यामुळे आर्यनच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करावी, अशी भूमिका आर्यनच्या वकिलांनी कोर्टात मांडली होती. यावर आर्यनच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणीची आवश्यकता नाही. अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी आठवड्याची वेळ द्यावी, अशी मागणी एनसीबीने केली. त्यामुळे आर्यनचा कोठडीतील मुक्काम वाढण्याची चिन्हे आहेत. मी निर्दोष आहे. कोणताही गुन्हा केलेला नाही. ड्रग्स बाळगणे, त्याची निर्मित किंवा आयात- निर्यात याच्याशी संबंधित असलेल्यांना आर्थिक सहाय्य केल्याचा पुरावा एनसीबीने सादर केला नाही. जामीन मिळाल्यावर मी पळून जाणार नाही, असा दावा आर्यनच्या वतीने वकिलांनी केला होता. मात्र सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पुरावे गोळा करणे सुरू आहे. या टप्प्यावर आर्यनला सोडले तर तो पुरावे नष्ट करू शकतो, अशी भूमिका एनसीबीने कोर्टासमोर मांडली.

राज बब्बरही त्‍यांच्‍याच मार्गावर…
आर्यनच्‍या अटकेनंतर अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री शाहरुखच्या पाठिशी उभी राहिली. जगातला सर्वात सज्जन मुलगा हा आर्यन खान आहे अशा अविर्भावात अभिनेते आणि अभिनेत्री आर्यनला पाठिंबा देत आहेत. आर्यनला पाठिंबा देणाऱ्यांत आता माजी खासदार आणि अभिनेता राज बब्बरने ही उडी घेतली आहे. आर्यन हा एका योध्याचा मुलगा आहे. शाहरुख खान योद्धा आहे. तो लढला आणि जिंकला सुद्धा. जग त्याच्या लहान मुलाला जखमांद्वारे शिकवत आहे. मात्र योध्याचा मुलगा असल्याने तो नक्कीच जिंकेल. माझा आशीर्वाद आहे, अशा आशयाचे व्टिट राज बब्बरने केले आहे. त्‍यांनी केलेले व्टिट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी सुद्धा अनेक सेलिब्रिटींनी आर्यनला पाठिंबा दिला आहे. यात जॉनी लिवर, रविना टंडन, हंसल मेहता, अभिषेक कपूर, शेखर सुमन यांचा समावेश आहे.