“या’अभिनेत्रीला शिल्पा शेट्टीबाबत वाटतेय सहानुभूती

मुंबई ः ज्या अभिनेत्रीने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर फसवणूक आणि पैसे न दिल्याच्या आरोपाखाली फिर्याद दाखल केली. त्याच अभिनेत्रीला आता शिल्पा शेट्टी व तिच्या मुलांबद्दल सहानुभूती वाटते आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे पूनम पांडे. बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी पोलिसांनी अटक केली. कुंद्रा आणि इतर एक आरोपी …
 

मुंबई ः ज्या अभिनेत्रीने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर फसवणूक आणि पैसे न दिल्याच्या आरोपाखाली फिर्याद दाखल केली. त्याच अभिनेत्रीला आता शिल्पा शेट्टी व तिच्या मुलांबद्दल सहानुभूती वाटते आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे पूनम पांडे.

बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी पोलिसांनी अटक केली. कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली. कुंद्राच्या अटकेमुळे बॉलिवूडमध्ये अगोदरच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर कुंद्राविरुद्ध फिर्याद देणारी आणि एरव्हीही कायम चर्चेत असलेल्या पूनम पांडे हिनं दिलेली प्रतििक्रया बोलकी आहे. ती म्हणाली, की पूर्वी काय झालं, याचा विचार मी करीत नाही. या वेळी मी फक्त शिल्पा आणि त्यांच्या मुलांचा विचार करते.

शिल्पा आणि तिच्या मुलांची मला काळजी वाटते. ही परिस्थितीच अशी आहे, माझ्यावरचा कुंद्रा यांनी केलेला अन्याय मांडून त्याचं मला भांडवल करायचं नाही. त्याची ही वेळ नाही. २०१९ मध्ये मी कुंद्राच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानंतर फसवणूक आणि चोरीच्या आरोपांखाली उच्च न्यायालयात दावा दाखल केला. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं मी त्यावर बोलू इच्छित नाही, असं पूनम म्हणाली. राज कुंद्रा आणि त्याची कंपनी तिच्या फोटोंचा आणि व्हिडीओचा गैरवापर करीत आहे, असा आरोप पूनमनं केला होता; मात्र कुंद्रा यांनी पूनमचे आरोप फेटाळून लावले होते.