रिया चक्रवर्तीचे लवकरच पुनरागमन!

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला प्रियकर अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अटक झाली होती. आता लवकरच ती कलाविश्वात पुनरागमन करणार आहे. चित्रपट दिग्दर्शक रुमी जाफरी यांनी याबाबत सांगितलं, की 2020 साल रियासाठी अत्यंत कठीण होतं. खरं तर हे वर्ष सगळ्यांसाठीच त्रासदायक ठरलं. मात्र, रियासाठी ते एका ट्रॉमासारखं होतं. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी 1 महिना तुरुंगात कशी राहिली …
 

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला प्रियकर अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अटक झाली होती. आता लवकरच ती कलाविश्‍वात पुनरागमन करणार आहे. चित्रपट दिग्दर्शक रुमी जाफरी यांनी याबाबत सांगितलं, की 2020 साल रियासाठी अत्यंत कठीण होतं. खरं तर हे वर्ष सगळ्यांसाठीच त्रासदायक ठरलं. मात्र, रियासाठी ते एका ट्रॉमासारखं होतं. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी 1 महिना तुरुंगात कशी राहिली असेल याची कल्पना तुम्ही करू शकता? ती मानसिकरित्या खचली आहे. मी रियाची भेट घेतली. कलाविश्‍वात परत आलीस तर नक्कीच इंडस्ट्री तुझं स्वागत करेल, असंदेखील तिला सांगितलं. रिया खूप बदलली आहे. शांत झाली आहे. जास्त बोलत नाही. जे काही घडलं त्याप्रकरणी तिला दोष देता येणार नाही. हे प्रकरण शांत झाल्यावर रिया अनेक गोष्टी नक्कीच सांगेल, असे रूमी म्हणाले. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रियाकडे मुख्य संशियत आरोपी म्हणून पाहिलं जात आहे. तसंच जवळपास 1 महिना रिया तुरुंगात होती. सध्या ती जामिनावर बाहेर आहे.