मुनमुन दत्ता म्हणाली, मालिकेत काहीपण दाखवताहेत!
मुंबई : गेल्या 13 वर्षांपासून “तारक मेहता का उलटा चष्मा’नं घराघरात स्थान मिळविलं आहे. आता या मालिकेचं दमणमधील शूटिंग संपलं आहे. मुंबईत चित्रीकरण सुरू असताना या मालिकेतील बबिता उर्फ मुनमुन दत्ता मालिकेच्या सेटवर एकही दिवस दिसली नाही. तिनं मालिका सोडली का, यावर चर्चा सुरू झाली. त्यावर मुनमुननं एका मुलाखतीत भाष्य करताना मालिकेच्या कथानकावर अप्रत्यक्ष टीका केली.
मालिकेत गेल्या दोन-तीन दिवसांपासून काहीही दाखविलं जात आहे, असा मुनमुनचा आरोप आहे. चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी दाखविल्या जात असल्याचं तिनं थेट भाष्य केलं. या शोमध्ये सध्या माझी गरज नसल्यानं मी सेटवर येत नाही, असं ती म्हणाली. मी काहीच ठरवीत नाही. प्रोडक्शन हाऊस ठरवतं. पुढच्या कहाणीचा निर्णय तेच घेतात. मी फक्त काम करते. माझी गरज नसेल, तर मी सेटवर जाण्यात अर्थ नाही, असं मुनमुन हिनं सांगितलं. मालिका सोडण्याचं मी ठरविलं तर ते मी प्रेक्षकांना स्वतः सांगेन. त्याचं कारण प्रेक्षक भावनिकदृष्ट्या माझ्या भूमिकेशी जोडलेले आहेत, असं ती म्हणाली.