प्रियांका चोप्रा जगातील २७ मोठ्या स्टार्सच्या यादीत!
जगातील २७ मोठ्या स्टार्सच्या यादीत अभिनेत्री प्रियांका चोप्राचं नाव आलं आहे. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही प्रियांकाने केलेल्या कामगिरीची दखल ‘ब्रिटिशवॉग’ या मॅगझिनने घेऊन तिचा असा सन्मान केला आहे.
यादीत व्हिओला डेविस, रिझ अहमद, केट विनस्लेट, आन्या टेलर जॉय, टॉम हॉलंड आणि साशा बरॉन कोहेन अशी नावं आहेत. या मोठ्या स्टार्सच्या पंगतीत प्रियांका जाऊन बसली आहे. यादीत समावेशाआधी प्रियांका चोप्राला काही प्रश्न विचारण्यात आले. यात कोणता हॉलीवूड कलाकार तुला सर्वांत जास्त आवडतो, असे विचारले असता प्रियांकाने सोफिया लोरेन या इटालियन अभिनेत्रीचे नाव घेतले. तिच्यात मी स्वतःला पाहते असे ती म्हणाली. एका प्रश्नाच्या उत्तरात प्रियांका म्हणाली, की मला ॲरोनॉटिकल इंजिनिअर व्हायचं होतं. मला विमानांचं फार आकर्षण होतं. मला विज्ञान आवडायचं, गणित आवडायचं. मला फिजिक्सचीही आवड आहे, असे ती म्हणाली. नुकताच प्रियांकाचा द व्हाईट टायगर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला अाहे. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय ती ‘सीटाडेल’, ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ‘द मॅट्रिक्स ४’ या कार्यक्रम- चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे.