पाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’

मुंबई ः तरुणींना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून, नंतर त्यांचे अश्लील व्हिडिओ काढायचे, ते ओटीटी प्लॅटफाॅर्मवर टाकायचे आणि त्यातून लाखोंची कमाई करायची, असा गोरज धंदा बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा करीत होता. त्यामुळे शिल्पाची कोंडी झाली असली तरी या निर्मितीत तिचा प्रत्यक्ष कुठेही संबंध नाही, असे पोलिस तपासांत स्पष्ट झाले आहे. पॉर्न …
 

मुंबई ः तरुणींना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून, नंतर त्यांचे अश्लील व्हिडिओ काढायचे, ते ओटीटी प्लॅटफाॅर्मवर टाकायचे आणि त्यातून लाखोंची कमाई करायची, असा गोरज धंदा बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा करीत होता. त्यामुळे शिल्पाची कोंडी झाली असली तरी या निर्मितीत तिचा प्रत्यक्ष कुठेही संबंध नाही, असे पोलिस तपासांत स्पष्ट झाले आहे.

पॉर्न फिल्म आणि वेब सीरीजची निर्मिती करून, ते प्रदर्शित केल्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रा याला अटक झाली आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी हिने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तिला या बाबतची कल्पना होती, असे सांगितले जात होते. तिचाही यात सहभाग होता, असाही आरोप केला जात होता; परंतु मुंबई पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतर शिल्पा शेट्टी या प्रकरणात “क्लीन चिट’ मिळाली आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनयाच्या आड चालविलेल्या जाणाऱ्या अश्लील चित्रपटांचा काळाबाजार उघडकीस आणला होता. खोलवर तपास केल्यानंतर आता शिल्पाचा पती राज कुंद्रा याला पोलिसांनी चतुर्भुज केले.