दोघांत चौथा येणार!
क्रिकेटर हरभजन सिंगने अभिनेत्री गीता बसरासोबत लग्न केलं होतं. आता त्या दोघांत लवकरच चौथा येणार असून, या पाहुण्याचे विशेष म्हणजे मोठ्या कौतुकाने स्वागताची तयारी सुरू झाली आहे. गीताने स्वतः ही न्यूज इन्स्टाग्राम खात्यावरून सर्वांना दिली आहे.
गीताने तिचे बेबी बम्पचे फोटोज सोशल मीडियावर टाकले आहेत. शिवाय काही फोटोंत ती कुटुंबासोबतही दिसत आहे. गीता, तिची मुलगी हिनाया आणि तिचा पती हरभजन दिसत आहेत. हिनायाने Soon to be big sister असा मजकूर लिहिलेला फलक हाती धरला आहे. Coming soon….July २०२१ असे कॅप्शन तिने फोटोंना दिले आहे. ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर गीता आणि हरभजन यांनी २९ ऑक्टोबर २०१५ रोजी लग्न केले होते. २०१६ मध्ये त्यांना हिनाया ही मुलगी झाली होती. गीताने तिच्या अभिनय करिअरची सुरुवात इमरान हाश्मीसोबत २००६ साली ‘दिल दिया है’ या चित्रपटातून केली होती. नंतर ‘द ट्रेन’, ‘जिला गाजियाबाद’, ‘सेकंड हँड हजबंड’, ‘लॉक’ या चित्रपटांमध्येही तिने काम केले. पण तिचे कोणतेच चित्रपट फारसे चालले नाहीत. त्यानंतर तिने हरभजला क्लिनबोल्ड केले. काही दिवस प्रेमात काढल्यानंतर दोघांनी लग्न केले.