दीपिका म्हणते, मला टीकाकारांनी शहाणं केलं!

ओम शांती ओम या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पदुकोनने कलाविश्वात पदार्पण केले होते. 2007 मध्ये हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. आजही या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. पहिलाच चित्रपट आणि तोही शाहरुख खानसोबत असल्याने दीपिकाची विशेष चर्चा झाली. तिच्या अभिनय कौशल्याचीही तारिफ झाली. मात्र सुरुवातीला जेव्हा तिची निवड या चित्रपटासाठी झाली तेव्हापासून ते चित्रपट पडद्यावर येईपर्यंत तिला …
 

ओम शांती ओम या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पदुकोनने कलाविश्‍वात पदार्पण केले होते. 2007 मध्ये हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. आजही या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. पहिलाच चित्रपट आणि तोही शाहरुख खानसोबत असल्याने दीपिकाची विशेष चर्चा झाली. तिच्या अभिनय कौशल्याचीही तारिफ झाली. मात्र सुरुवातीला जेव्हा तिची निवड या चित्रपटासाठी झाली तेव्हापासून ते चित्रपट पडद्यावर येईपर्यंत तिला अनेकांच्या टीकाटिप्पणी सहन कराव्या लागल्या. अरे ही तर मॉडेल आहे, हिला काय अभिनय येणार असं म्हणत अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती. अनेकांनी तिच्या विरोधात लिहिलं. काही चुकीची माहिती पसरवली. यावर दीपिका सांगते, की या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप परिणाम झाला होता. जेव्हा तुम्ही केवळ 21 वर्षांच्या असता आणि या वयात तुम्हाला अशा टीकांना सामोरं जावं लागतं त्यावेळी सगळ्याचा परिणाम थेट तुमच्यावर होत असतो, असं दीपिका म्हणाली. पण या टीकाकारांमुळेच मी पुढे जाऊ शकले. त्यांच्या टीकांमुळे मी माझ्या कामात सुधारणा केली. ज्यामुळेच मी आज या जागेवर आहे. त्यामुळे माझ्यावर टीका करणार्‍यांचे मनापासून आभार. त्यावेळी मला काही गोष्टी समजत नव्हत्या. पण, शाहरुख आणि फराह खानने माझी साथ दिली आणि या सगळ्या गोष्टी मला नीट समजावून सांगितल्या, असेही दीपिका म्हणाली. ओम शांती ओम लोकप्रिय झाला. त्यातील गाणी तुफान चालली. या चित्रपटानंतर शाहरुख- दीपिका ही जोडी चेन्नई एक्स्प्रेसमध्येदेखील झळकली. हाही चित्रपट सुपरहिट झाला.