…त्यानं मला विचित्रपणे स्पर्श केला… आराधना शर्माचंही “मी टू’!

मुंबई ः चित्रपट, मालिकांत काम करणाऱ्या अभिनेत्रींना अनेकदा वाईट अनुभव येत असतात. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील ‘स्प्लिट्सविला’ फेम आराधना शर्मा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरली आहे. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला; परंतु त्याच आराधनाला १९ व्या वर्षी कास्टिंग काउचचा सामना करावा लागला. तिनंच एका मुलाखतीत हे सांगितलं. …
 

मुंबई ः चित्रपट, मालिकांत काम करणाऱ्या अभिनेत्रींना अनेकदा वाईट अनुभव येत असतात. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील ‘स्प्लिट्सविला’ फेम आराधना शर्मा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरली आहे. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला; परंतु त्याच आराधनाला १९ व्या वर्षी कास्टिंग काउचचा सामना करावा लागला. तिनंच एका मुलाखतीत हे सांगितलं.

एका कास्टिंग एजंटनं आराधनासोबत जे केलं, त्याचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला. तिचा पुरुषांवरचा विश्वासच उडाला. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये आराधना डिटेक्टिव्ह दीप्तीच्या भूमिकेत दिसली होती. तिच्या अभिनयामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अर्थात कुणालाही संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. आराधनालाही मोठा संघर्ष करावा लागला आहे. तिला अभिनय क्षेत्रात करिअर करताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागलं, तिनं त्यावर कशी मात केली, याचा उहापोह आराधनानं एका मुलाखतीत केला आहे.

“मी पुण्यात शिक्षण घेत असताना थोडंफार मॉडेलिंग करायचे. मुंबईतील एक व्यक्ती एका प्रोजेक्टसाठी कास्टिंग करत होती. तिला आणखी काही रोल कास्ट करायचे होते. त्यामुळं आम्ही रांचीत भेटलो. स्क्रिप्ट वाचत असताना त्यानं मला विचित्रपणे स्पर्श केला.” असं आराधना म्हणाली. मी त्याला धक्का दिला. तिथून पळून गेले. हा माझ्यासाठी खूप वाईट अनुभव होता. मी आणि आई त्याला जाब विचारणार होतो; मात्र कुटुंबीयांनी आम्हाला तसं करू दिलं नाही, असं ती म्हणाली. त्यामुळं आराधना मार्शल आर्टस्‌ शिकली आहे.