….तर कंगणा दिसली असती अडल्ट मूव्हीत!

कंगणा राणावत ही फटकळ तितकीच बिनधास्त अभिनेत्री आहे. मोदी सरकारशी तिचे असलेले सख्य कायम चर्चेत असते. तिच्याबद्दल ना ना प्रकारच्या चर्चा असतात. आता तिच्याबद्दल आणखी एक चर्चा सुरू आहे. बॉलीवूडमध्ये येण्याआधी ती एका अश्लील चित्रपटात काम करणार होती. तिने तो चित्रपट स्वीकारलाही होता. कारण तिला कामाची गरज होती. अत्यंत विचित्र कपडेही तिला देण्यात आले होते. …
 
….तर कंगणा दिसली असती अडल्ट मूव्हीत!

कंगणा राणावत ही फटकळ तितकीच बिनधास्त अभिनेत्री आहे. मोदी सरकारशी तिचे असलेले सख्य कायम चर्चेत असते. तिच्याबद्दल ना ना प्रकारच्या चर्चा असतात. आता तिच्याबद्दल आणखी एक चर्चा सुरू आहे. बॉलीवूडमध्ये येण्याआधी ती एका अश्लील चित्रपटात काम करणार होती. तिने तो चित्रपट स्वीकारलाही होता. कारण तिला कामाची गरज होती.

अत्यंत विचित्र कपडेही तिला देण्यात आले होते. मात्र त्याचवेळी तिला गँगस्टर चित्रपटाची ऑफर आली आणि तिने लगेच या अश्लील चित्रपटाला नकार कळवला. अन्यथा कंगणा ही कधीच सुपरस्टार होऊ शकली नसती, ती कायम अडल्ट चित्रपटांतच काम करत राहिली असती. कंगणानेच ही माहिती दिली. ती म्हणाली, की मला मिळालेला चित्रपट खालच्या दर्जाचा होता. तो चांगला नाही हे माहीत असूनही कामाची गरज होती. त्यामुळे होकार कळवला होता.

त्यावेळी ती केवळ १७-१८ वर्षांची होती, असे तिने सांगितले. आजवर कंगनाने आपल्या चित्रपटांत अश्लील दृश्ये दिली आहेत. मात्र ते सारे बिग बजेट चित्रपट होते. त्यामुळे या दृश्यांबद्दल तिचे कौतुकच झाले. बोल्ड फोटो शूटबद्दलही ती चर्चेत असते. लवकरच तिचा धाकड सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बुडापेस्टमधून या सिनेमाचे शूटिंग पूर्ण करून ती भारतात परतली आहे.