कंगणा राणावतने बहीण-भावासाठी घेतले 4 फ्लॅट

अभिनेत्री कंगणा राणावत भलेही वादग्रस्त वक्तव्ये करून अनेकांची नाराजी ओढावून घेत असेल पण भावंडांच्या बाबतीत मात्र ती खूपच हळवी आहे. कंगनाने चंदीगडमध्ये चार नवे फ्लॅट चक्क बहीण रंगोली चंडेल आणि भाऊ अक्षतसाठी खरेदी केले. सध्या कंगणा आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.कंगनाने चार कोटी रुपयांत हे फ्लॅट खरेदी केले आहेत. फ्लॅट विमानतळाजवळच आहेत. चंदीगडमधील सर्वात पॉश …
 

अभिनेत्री कंगणा राणावत भलेही वादग्रस्त वक्तव्ये करून अनेकांची नाराजी ओढावून घेत असेल पण भावंडांच्या बाबतीत मात्र ती खूपच हळवी आहे. कंगनाने चंदीगडमध्ये चार नवे फ्लॅट चक्क बहीण रंगोली चंडेल आणि भाऊ अक्षतसाठी खरेदी केले. सध्या कंगणा आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
कंगनाने चार कोटी रुपयांत हे फ्लॅट खरेदी केले आहेत. फ्लॅट विमानतळाजवळच आहेत. चंदीगडमधील सर्वात पॉश हा परिसर आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या चरित्रपटात लवकरच कंगना मुख्य भूमिका साकारणार आहे. थलाइवीनंतर तिचा हा दुसरा राजकीय चित्रपट असणार आहे. इंदिरा गांधी यांच्यावर आधारित हा चित्रपट एका पुस्तकावर आधारित आहे. इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लूस्टार हे दोन मोठे निर्णयही या सिनेमात दाखवले जाणार असल्याचे समजते. चित्रपटाचे कथानक साई कबीर यांनी लिहिले असून, दिग्दर्शनही साई कबीरच करणार आहेत.