एकाचवेळी दोघींना फिरवत होता म्हणून बिपाशानं तोडलं नातं!
चित्रपट क्षेत्रात एकाहून अधिकांशी असलेल्या प्रेमसंबंधाची उदाहरणं काही कमी नाहीत. एकाच वेळी दोन जणींशी डेट करणं चुकून जरी उघड झालं, तर संगळं संपलच म्हणून समजा. बिपाशा बासू आणि जाॅन अब्राहम यांच्याबाबतीतही तसंच झालं. एका ट्वीटनं होत्याचं नव्हतं झालं. बिपाशा-जाॅनचं ब्रेकअप झालं.
बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम यांचं रिलेशनशिप सर्वांनाच माहीत होतं. थोडी थिडकी नाही, तर नऊ वर्षे हे दोघं रिलेशनशीपमध्ये होते. दोघं एकमेकांना डेट करीत होते. लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता; मात्र अचानक जाॅनच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आलं. ती दुसरी तिसरी कुणी नव्हती, तर ती होती प्रिया रुंचाल. २०१४ च्या नववर्षाच्या शुभेच्छा देताना उत्साहाच्या भरात जाॅननं शेवटी त्याचं आणि प्रियाचं नाव लिहिलं आणि तिथंच वादळ आलं. बिपाशाला जाॅन आपली फसवणूक करीत असल्याचं लक्षात आलं. एकाच वेळी बिपाशा आणि प्रियाशी डेट करणं आणि त्यातही त्याचं भांडं फुटणं त्याला चांगलंच महागात पडलं. बिपाशानं ब्रेकअपचा निर्णय घेतला.
दोन व्यक्ती एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात; परंतु त्यातील जोडीदार जेव्हा प्रेमाचाच विश्वासघात करतो, तेव्हा होणारं दुःख शब्दातीत असतं. एकमेकांपासून वेगळं होणं हा त्यावरचा उपाय असला, तरी त्यानं नैराश्य येतं. अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. एकमेकांपासून विभक्त झालं, तरी त्यातून सावरायचं असतं. सकारात्मक विचार करायचा असतो. अभिनेत्री बिपाशा बासू ब्रेकअप दरम्यान नैराशात गेली होती. तिला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता. ती त्यातून सावरली. विश्वास, खरेपणाला ती महत्व देते. धोका देणं आपल्या रक्तात नाही, असं तिनंच एका मुलाखतीत सांगितलं होतं.