एकता कपूरचे 47 व्या वर्षांत पदार्पण..अजून आहे अनमॅरिड…कारण आहे खास!
मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः अभिनेता जितेंद्रची मुलगी, तुषार कपूरची बहीण असलेली एकता कपूर टीव्ही मालिका निर्माती म्हणून प्रसिद्ध आहे. काल, 7 जूनला तिने 47 व्या वर्षात पदार्पण केले आहे. मात्र अजूनही तिने लग्न केलेले नाही, हे विशेष. लग्न न करण्याचं कारणही जरा खासच आहे. अर्थात हे कारण खरं नसलं तरी, लग्न केव्हा करणार हे मात्र तिने सांगून टाकले आहे. सलमान खान लग्न करेल त्यानंतर मी 2 वर्षांनी लग्न करेल, असे एकताने एका मुलाखतीत म्हटले आहे.
आजवर 40 हून अधिक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती एकताने केली आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात 1995 मध्ये केली. हम पांच, क्योंकि सास भी कभी बहू थी, कसौदी जिंदगी की, कहानी घर-घर की आणि नागिन या तिच्या मालिका विशेष करून गाजल्या आहेत. स्मृति ईराणी, साक्षी तन्वर, श्वेता तिवारी, मौनी रॉय यांचे संपूर्ण आयुष्य एकतामुळे बदलले आहे, हे विशेष.