इसाबेललाही सलमान आणणार बॉलिवूडमध्ये

2005 मध्ये मैंने प्यार क्यों किया चित्रपटातून अभिनेत्री कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. तिला कलाक्षेत्रात 15 वर्षे झाली असून, ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आता तिच्यापाठोपाठ तिची धाकटी बहीण इसाबेलदेखील बॉलिवूडमध्ये दाखल होणार असून, इसाबेलला कतरिनाचा खास मित्र सलमान खान बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या अफेअरची …
 

2005 मध्ये मैंने प्यार क्यों किया चित्रपटातून अभिनेत्री कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. तिला कलाक्षेत्रात 15 वर्षे झाली असून, ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आता तिच्यापाठोपाठ तिची धाकटी बहीण इसाबेलदेखील बॉलिवूडमध्ये दाखल होणार असून, इसाबेलला कतरिनाचा खास मित्र सलमान खान बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या अफेअरची चर्चा कायम रंगत आली आहे. पण या चर्चेला फारसे महत्त्व दोघांनीही दिले नाही. चांगले मित्र या पलिकडे त्यांनी दोघांच्या नात्याला जास्त महत्त्व दिलं नाही. इसाबेलने माशा-अल्लाह या गाण्यातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. इसाबेलचे हे गाणे नुकतेच रिलीज झाले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉलीवूडमध्ये कतरिनाला लाँच करणार्‍या सलमान खानने देखील इसाबेलचे हे गाणे सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. एवढंच नव्हे तर तिच्या गाण्याचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आजवर भाग्यश्रीपासून नगमा, रवीना टंडन, आयेशा जुल्का, रेवती यासारख्या नामांकित अभिनेत्रींना देखील सलमाननेच लाँच केले होते. त्यानंतर नव्या काळातील कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, डेझी शाह, झरीन खान या अभिनेत्रींनाही त्यानेच कलाक्षेत्रात आणले.